Ad will apear here
Next
‘पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची’
वृक्षारोपण करताना गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयलपुणे : ‘पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनाची आवश्यकता आहे,’ असे मत गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गंगा लेजंड बावधन आणि गंगाधाम टॉवर्सजवळील परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमास सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘पर्यावरण आणि त्याच्या संरक्षणाप्रतीची आपली जबाबदारी प्रत्येकाने ओळखल्यास पर्यावरणासोबतच आपणा सर्वांचेही जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे अत्यावश्यक आहे. आपण केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करावी.’

गंगा लेजंड बावधन आणि गंगाधाम टॉवर्स या दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी या उपक्रमांतर्गत येत्या वर्षभरात पाच हजारांहून अधिक झाडे लावली जाणार असल्याचे फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल यांनी सांगितले.    

या प्रसंगी नगरसेवक किरण दगडे पाटील, संबंधित प्रकल्पाच्या तांत्रिक विभागात काम करणारे निखील अत्रे, कुमार बर्डे, एस. के. मिश्रा, प्रदीप सोहनी, विकास गारडे, अंकित गोयल, उद्य पाटील आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVMBP
Similar Posts
‘गृहिणी असणे हा नोकरीपेक्षाही उच्च सन्मान’ पुणे : ‘महिला दिन खरेतर एक दिवसाचा नसून तो वर्षभर साजरा केला पाहिजे. ज्या माध्यमातून महिला शक्ती व महिलांचा सन्मान सातत्याने घडवून आणणे आवश्यक आहे. ‘गृहिणी’ घरात पूर्णवेळ राबत असते. मुलांचे संगोपन, घरातील व्यवहार, मुलांवर संस्कार अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. त्यामुळेच ‘गृहिणी’ असणे हा नोकरीपेक्षाही
गोयल गंगा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर पुणे : ‘रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करतानाच जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करून रक्‍तदात्यांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे
गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव पुणे : स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला. गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने गंगा ग्लिटझ येथे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया सोहळ्यात स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन गीता गोयल यांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले. सातारा
‘पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी’ पुणे : ‘पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच झाडे लावून ती जगवली पाहिजेत. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. सायकलचा वापर करावा. प्लास्टिकला हद्दपार करायला हवे,’ असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language